स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूणमधील जामा मशिद कोंढे येथे गुहागरला जाण्यासाठी उजव्या बाजूला उभ्या असलेल्या पादचाऱ्याला स्कॉर्पिओने विरुध्द दिशेला येऊन धडक दिली. या धडकेत पादचारी तरुण जखमी झाला. त्यानंतर स्कॉर्पिओने पुढे जावून तीन दुचाकींना धडक दिली.
या अपघातात दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अकिब फिरोज शेर ( १७ , कोंढे फाटा जामा मशिद समोर , चिपळूण ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अकिब याने पोलीस स्थानकात दिल्यानंतर स्कॉर्पिओ चालक राकेश संतोष परब ( मुंबई ) याच्यावर भादविकलम २७ ९ , ३३७ , ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे .