चिपळूणात वृध्द आईवर मुलाकडून कोयतीने वार

चिपळूण:- वृध्द आईवर मुलाने कोयतीने वार केला असून यात ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. इतकेच नव्हे तर पतीसह सुनेनेही तिला मारहाण केली. या तिघांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तराम वाजे, अजय दत्ताराम वाज़े, अनघा अजय वाजे ( सर्व वाजेवाडी- मालघर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद सुलोचना दत्ताराम वाजे (७०, वाजेवाडी- मालघर) यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना वाजे यांचे पती दत्ताराम वाजे, मुलगा अजय वाजे व सून अनघा वाजे यांच्यात मालघर येथील नवीन घराच्या मालकी हक्कावरुन वाद आहेत. दत्ताराम, अजय व अनघा वाजे हे तिघेजण वडिलोपार्जित घरामध्ये राहतात व सुलोचना वाजे या घराच्या शेजारी बांधलेल्या नवीन घरामध्ये राहतात. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुलोचना या घरी- जेवण करत असताना घराच्या दरवाजातून `दत्तराम, अजय व अनघा वाजे या तिघांनी शिवीगाळ केली. तसेच घरामध्ये येऊन घराचा दरवाजा लावून घेत दत्ताराम याने सुलोचना यांना ओढत आणून हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.