चिपळूण:-चिपळूणमध्ये सती ते चिंचघरी असा दुचाकीवरुन प्रवास करणार्या दुचाकीस्वाराची दगडावर आदळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ जाधव (40, चिंचघरी, चिपळूण) हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन गुरुवारी सती ते चिंचघरी असे जात होते. यावेळी जाधव यांचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याबाहेर असलेल्या दगडाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक अर्चना चव्हाण यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली.