चिपळूणात गोडावून फोडून 1 लाखाच्या तांब्या, पितळेची चोरी

चिपळूण:- तालुक्यातील साखरवाडी मिरजोळे गुहागर रोड येथे संकल्प ट्रेडर्सचे गोडावून फोडून त्यातील 1 लाख 28 हजार 250 रुपयांच्या तांब्या व पितळेची चोरी केल्याची घडना घडली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संदेश भोबेकर (45, अमेय पार्क, चिपळूण) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजोळे गुहागर रोडवरील बंदिस्त गोडावून फोडून अज्ञाताने 56 हजार 250 रुपये किंमतीचे 150 किलोचे पितळ, 72 हजार रुपये किंमतीचे 120 किलोचे तांबे असा एकूण 1 लाख 28 हजार 250 रुपये किंमतीचा माल चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम 380, 461 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.