चिपळूण:-तालुक्यातील बिवली येथे शुल्लक कारणातून दोन गटात मारहाण झाल्याची घटना 30 मे रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोघेजण जखमी झाले असून दोन्ही गटातील 6 जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील एका गटातील दत्ताराम सखाराम भालेकर (84, बिवली) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते त्यांच्या जनावराच्या गोठ्याच्या बाजूला आंबा बागेत गेले होते. त्यावेळी त्यांच पुतण्या मिलिंद हा घरातून बाहेर आला व त्याने ‘तुम्ही इथे कशाला आलात, इथे यायचे नाहीत, तुला ठार मारुन टाकतो’ अशी धमकी देत त्याने त्यांना दगडाने व काठीने तसेच विजया हिने हाताने मारहाण केली. त्या दोघांनी दत्ताराम यांच्या पत्नीलाही मारहाण करुन धमकी दिली. यानुसार विजया विष्णू भालेकर, मिलिंद विष्णू भालेकर (दोघे, बिवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या गटातील विजया विष्णू भालेकर (55, बिवली) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गुन्हा दाखल झालेले वरील सर्वजण विजया भालेकर यांच्या जनावराच्या गोठ्याकडे आले व गोठ्यातील साहित्याची हलवाहलव करु लागले. म्हणून त्यांचा विजया यांच्या मुलाने अडवले असता दत्ताराम भालेकर, सावित्री भालेकर, संतोष भालेकर, सरीता भालेकर यांनी विजया यांच्यासह मुलाला मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी सावित्री दत्ताराम भालेकर, संतोष दत्ताराम भालेकर, सरीता संतोष भालेकर, (सर्व, बिवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.