चिपळूण:- शहरातील लाईफकेअर हॉस्पिटल परिसरात बुधवारी रात्री १२.३० वाजता झालेल्या दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
साहिल जयंत कासार (२५, खंड-कांगणेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. साहील व त्याचे मित्र वेगवेगळ्या दुचाकींवरून शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला जात होते. यावेळी बायपास मार्गावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी मोरीत घुसली. यातच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती त्याच्या मित्रांनी कांगणेवाडी येथील दिल्यानंतर नागरिकांना नागरिकांनी येथे धाव घेतली. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साहील याच्यावर गुरुवारी रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे वडील जयंत कासार हे नगरपरिषदेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.