चिपळूण:- टँकरने जांभा दगड घेऊन जाणाऱ्या डंपरला धडक दिल्याची घटना तालुक्यातील निव्र्व्हळ येथील एका वळणावर ९ रोजी घडली. यात टैंकर चालक दीपक माणीक गौड (उत्तरप्रदेश) जखमी झाला असून या अपघातप्रकरणी त्याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद राजेंद्र शशिकांत सुर्वे (३८, अलोरे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सुर्वे डंपरमध्ये जांभा दगड भरून तनाळी ते शिरगाव असे जात होते. ते निर्व्हळ गावाच्या वळणाजवळ आले असता चिपळूणकडून आलेल्या टैंकर चालक दीपक गौड याचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपरला धडक दिली.