चिपळूण:- शहरातील मुरादपूर- भाईवाडी येथे २२ वर्षीय तरुणाने आईला मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. यात आईच्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी चिपळूण पोलिसात मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज सुभाष घाडगे (२२) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद दत्ताराम दिलीप घाडगे (२८) यांनी दिली. अस्मिता सुभाष घाडगे (४८, सर्व रा. मुरादपूर-भोईवाडी) या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम घाडगे यांची मुरादपूर- भोईवाडी येथे राहणारी मावशी अस्मिता घाडगे यांना त्याचा मुलगा पंकजने हाताने तसेच लाकडी काठीने मारहाण केली. यात त्यांच्या दोन्ही हाताला दुखापत झाली. या प्रकरणी पंकज याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.