पाचल:-ओणी -पाचल मार्गावरील येळवण-कोळवण गावच्या सीमेवर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फोर व्हीलर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून फोर व्हीलर गाडीचा ड्रायव्हर अपघाता नंतर फरार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार गावं सौंदळ शनिवारी दुपारी नरुल्ला नाईक यांच्या मुलीचा लग्न सोहळा आटपुन जेवणाचा कार्यक्रम चालू होता.यावेळी जेवणाच्या टेबलावर टाकण्यात येणारा पांढरा प्लास्टिक पेपर आणण्यासाठी जवळच असलेल्या पाचल गावच्या बाजारपेठेत मोहम्मद साहेब अली साहेब मापारी (वय वर्ष 48 राहणार सौंदळ मुस्लिम वाडी) तसेच सिराज मुस्ताक नाईक (वय वर्ष 22 राहणार सौंदळ मुस्लिमवाडी) हे दोघे जण बाईक वरून पाचल ला गेले होते. पाचवरून माघारी परतताना येळवन आणि कोळवण या गावच्या सीमेवर समोरून येणाऱ्या महिंद्रा मॅक्झिमो (गाडी नंबर *एम एच -04- ई एक्स- 6155) या गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये सिराज नाईक हे जागीच ठार झाले तर मोहम्मद साहेबअली साहेब मापारी हे महिंद्रा मॅक्झिमो या चार चाकी वाहनाखाली अडकून पडले होते. त्यांचा श्वासोच्छ्वास चालू होता अशा वेळी चारचाकी वाहनांच्या चालकाने त्यांचा जीव वाचवण्याचे सोडून झालेला भीषण अपघात पाहता मी स्वतः जाऊन पोलिसांच्या स्वाधीन होतो असा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असे घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामस्थानी सांगितले,परंतु थोड्यावेळाने घटनास्थळी पोलिस आल्यावर असं समजलं सदर चालक हा पोलीस स्टेशनला हजर न होताच तो फरार झाल्याचे कळाले.दुसरीकडे पोलिस आणि सदर मयत व्यक्तीचे नातेवाईक येण्यापूर्वीच मोहम्मद साहेब मापारी यांचादेखील मृत्यू झाला होता.
लग्न समारंभ जवळच असलेल्याने सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले होते दोघांचे मृत्यू देह पाहून सर्वांनी टाहो तर फोडला परंतू संसप्त नातेवाईकांनी पुर्ण रस्ता बंद केला होता. जो पर्यंत आमच्यासमोर ड्राइवर ला हजर करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याने एकही गाडी जाऊ देणार नाही अशी भूमिका नातेवाईकांस संपूर्ण सौंदळ ग्रामस्थांनी घेतली होती. याला कारणही तसंच असल्याचे पुढे समजलं, दोनवर्षांपूर्वी पैंजाण रायबागकर आणि समीर नाईक हे तरुण याच सौंदल मध्ये अपघाती मरून पडले त्यांना अजून न्याय मिळाला नाही.मग यांचं काय?असे भावनिक आणि न सुटणारे प्रश्न उपस्थित करून पूर्ण रस्ता ग्रामस्थांच्या वतीने बंद करण्यात आला होता.
शेवटी राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्धन परबकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली नातेवाईकांची सहानभूतीपूर्वक चर्चा करून सदर रस्ता जवळजवळ तिनं तासानंतर वाहतुकीसाठी मोकळा करून दोन्ही मृत्यूदेह ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे पोस्टमॉटमसाठी नेण्याचे आदेश दिले..
सदर घटनेचा कलम 304अ,279,338, भा. द. वी.134 (अ )(ब )मोटर वाहन कायदा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर तपासात मेजर कमलाकर पाटील, मेजर सावंत,पी सी कात्रे, पी सी कोळी, ए एस वाघाटे,नामें मॅडम, स्वामी मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.फरार झालेल्या वाहक चालकाचा शोध घेत असून पुढील तपास राजापूर तालुका पोलीस निरीक्षक जनार्धन परबकर करत आहे.