रत्नागिरी:- चारचाकी वाहन खरेदीसाठी नेफ्ट प्रणालीद्वारे सुमारे 36 लाख 50 हजार 280 रुपये भरुनही गाडी न देता अपहार केल्याप्रकरणी ऑटोमोटिव्ह कंपनीच्या संचालकाला शहर पोलिसांनी अटक केली.त्याला तळोजा नवी मुंबई पोलिसांकडून शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
फसवणूकीची ही घटना 29 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 ते 4 वा.कालावधीत घडली होती.
अर्जुन राजेश राज(23,रा.कळंबोळी,नवी मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या करण्यात संचालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात मतीन अलिमियाँ परकार (40,रा.थिबा पॅलेस रोड,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती.त्यानूसार,29 सप्टेंबर2021 रोजी मतीन परकार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे स्कुडेरिया ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मध्ये स्कोडा सुपर्ब ही गाडी घेण्यासाठी शिवाजी नगर येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून नेफ्टने 36 लाख 50 हजार 280 रुपये भरले होते.परंतू पैशांचा भरणा करुनही कंपनीने त्यांना गाडी न देता पैशांचा अपहार केला.म्हणून आपली फसवणूक केल्याप्रकरणी मतीन परकार यांनी कंपनीचा संचालक अर्जुन राजेश राज विरोधात गुरुवार 9 डिसेंबर रोजी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती.