रत्नागिरी:- दुचाकीवर ट्रिपल सिट घेउन जात असताना अपघात होउन चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवार 19 फेब्रुवारी रोजी चाफे ते गणपतीपुळे जाणार्या रस्त्यावरील ओरी फाट्याजवळ घडली होती.
सुशांत रविकांत घोसाळकर (19, मुळ रा. रायगड सध्या रा.जयगड,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र संकेत देवदत्त देशपांडे (21, मुळ रा.निपाणी बेळगाव,कर्नाटक सध्या रा.दापोली) यांने जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवार 19 फेब्रुवारी रोजी सुशांत घोसाळकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-06-एव्ही-7128) वर संकेत देशपांडे आणि त्याचा मित्र सार्थक शिर्के यांना विना हेल्मेट ट्रिपल सिट घेउन भरधाव वेगाने जात होता. ते चाफे गणपतीपुळे जाणार्या रस्त्यावरील ओरी फाट्याजवळ आले असता सुशांतचा दुचाकीवरील ताबा सूटल्याने अपघात होउन यात सुशांतचा मृत्यू झाला. तर संकेत देशपांडे आणि सार्थक शिर्के या दोघांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी सुशांत विरोधात भादंवि कायदा कलम 304 (अ), 279 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.