रत्नागिरी:- तालुक्यातील चाफेरी येथे रस्त्याकडेला दारु पिण्यासाठी बसलेल्या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. विजय पुणाजी बलेकर (५२, रा. कांबळेलावगण आठघराणेवाडी ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास चाफेरी येथे रस्त्याकडेला असणाऱ्या झाडाखाली दारु पिण्यासाठी बसल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या, अशी नोंद जयगड पोलिसात दाखल करण्यात आली. तसेच पोलिसांनी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल केला.