रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई येथे एका अनोळखी तरुणाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृतदेह नग्न आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे. रत्नागिरी ते देवधे व्हाया चांदेराई जाणाऱ्या रस्त्यावरील उमरे क्रेशरजवळ नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला.