रत्नागिरी:-चांदसूर्या येथून वडापाव सेंटर समोरुन दुचाकी चोरीप्रकरणी हरियाणा येथील संशयित चोरटयाला अटक करण्यात आली. पवनकुमार उदयसिंग (24, हरियाणा) याला 15 एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत मांडवकर (45, घवाळीवाडी, रत्नागिरी) यांनी याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यांनी 14 एप्रिल रोजी चांदसूर्या खेडशी येथे वडापाव सेंटर समोर उभी करुन ठेवलेली पांढर्या रंगाची 30 हजार रुपये किंमतीची अॅक्सीस 125 मोटरसायकल सायंकाळच्या सुमारास चोरीस गेली. याबाबतची फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत संशयित पवनकुमार उदयसिंग याला ताब्यात घेतले. त्याच्यावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.