रत्नागिरी:- तालुक्यातील चरवेली पोस्ट खात्यात जवळपास ५२ खातेदारांची फसवणूक करून २५ लाख १३ हजार २१३ इतकय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन डाकसेवक सचिन शशिकांत पवार यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपीत हा दि .२१/ १०/ २०१० पासुन ते दि .०७ / ०५ / २०२२ या कालावधीत तत्कालीन ग्रामीण डाक सेवक डाकपाल चरवेली शाखा डाकघर , ता. जि. रत्नागिरी येथे सरकारी नोकरीवर नेमणुकीस असताना आपल्या पदाचा गैरवापर करुन चरवेली गावातील व चरवेली परिसरातील एकुण ५२ खातेदारांची एकुण- २५,१३,२१३ / – रु . रक्कम खातेदारांकडुन स्विकारून ती खातेदारांची पोस्ट खात्यातील खात्यामध्ये जमा न करता तसेच काही खातेदारांच्या अपरोक्ष त्यांच्या खात्यातुन परस्पर रक्कम काढुन त्या एकुण रकमेचा स्वतःचे फायदयाकरिता वापर करुन रकमेचा अपहार करुन खातेदारांची तसेच डाक विभागाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गणपत सीताराम राणे यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी भा. दं. वि. कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.