रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे चक्कर आलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रेवणसिद्धा दुंडाप्पा मकाने (वय ३५, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी नऊ च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुंडाप्पा याला मद्याचे व्यसन होते. सोमवारी (ता. ८) पासून त्याने मद्य पीणे बंद केले होते. मात्र अचानक त्याला चक्कर आल्याने तो बेशुद्ध झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.