रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर-चंपक मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करण्याऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश देवराम जाधव (वय ५२, रा. करबुडे, कपिलवस्तु, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास चंपक मैदान येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित जाधव हा सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.