चंपक मैदानात दारू पिणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील चंपक  मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी झाडाच्या आडोशाला दारू पिणाऱ्या एकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. खाजापटेल इमामपटेल तळोळी (वय ४४, रा. झाडगाव, एमआयडीसी रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (ता. ६) रात्री साडेआठच्या सुमारास चंपक मैदान येथील झाडाच्या आडोशाला निदर्शनास आली. संशयित हा मद्य प्राशन करत असताना आढळला. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.