चंपक मैदानात गांजाचे सेवन करणाऱ्या दोघा तरुणांना अटक

रत्नागिरी:- शहराजवळील चंपक मैदानात गांजाचे सेवन करणार्‍या दोन तरुणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

साकिब मोहंमद शिरगावकर (26, रा. किर्तीनगर, रत्नागिरी), अलसलाह अबीदअली मालगुंडकर (25, रा.चर्मालय, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता.19) रात्री आठच्या सुमारास चंपक मैदान येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ग्रामीण पोलिस चंपक मैदान परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संशयित अमंली पदार्थाचे सेवन करत असताना दिसले पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे 7.27 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगून त्याचे सेवन करत होते. दोघांनाही पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकी, दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी (ता. 20) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.