रत्नागिरी:- शहरातील घुडेवठार येथे अज्ञात कारणातून एकाला तिघांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वा. घडली आहे.
कुंदन नामदेव घुडे, साईराज कुंदन घुडे, अमोल गजानन नार्वेकर (सर्व रा.दत्तमंदिर शेजरी घुडेवठार, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात प्रितम रमाकांत वारंग (36 ,रा.घुडेवठार, रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी अज्ञात कारणातून संशयितांनी त्यांला शिवीगाळ करत हातांनी तसेच स्टंप आणि दगडाने मारहाण केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.