खेड:- मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दुचाकी समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदकुमार बाळाराम जाधव ( २० ) , अल्पेश कृष्णा जाधव ( १८ ) दोघेही राहणार सुकीवली बौद्धवाडी अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत . हे दोघेजण लोटे एमआयडीसीमधून कामावरून घरी परतत असताना भोस्ते घाटातील मोरवंडेनजीक त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला . जखमींना तत्काळ खेडमधील एस एम एस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .