घरात घुसून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

चिपळूण:- घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांच्या वादातून दिवसाढवळ्या घरात शिरुन काठीने डोक्यात मारहाण करुन खून केल्याची घटना 28 जुलै 2018 रोजी गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर-खारवीवाडी येथे घडली होती. या प्रकरणाचा खटला सुरु असताना साक्षी, पुरावे यांच्या आधारावर शनिवारी खून करणाऱ्यास दोषी ठरवून त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायालयाने न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी हा निकाल दिला.

नंदकुमार बाबाजी तांडेल (वेळणेश्वर-खारवीवाडी) असे कारावासाची शिक्षा झालेल्याचे, तर दिवाकर हरी तांडेल (वेळणेश्वर- खारवीवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद देवयानी दिवाकर तांडेल (वेळणेश्वर- खारवीवाडी) यांनी दिली होती.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर खारवीवाडी येथे दिवाकर तांडेल व नंदकुमार तांडेल ही दोन कुटुंबे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. नंदकुमार यांची पत्नी अंजली हिने दिवाकर यांची पत्नी देवयानी हिला टोमणा मारला. याचे कारण विचारल्याने यातूनच त्या दोन कुटुंबामध्ये वाद सुरु झाला. हा वाद मिटावा यासाठी गावातील पंचांसमोर पयत्नही झाला. या वादाचा राग नंदकुमार याने मनात ठेवला होता. त्याने 28 जुलै 2018 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दिवाकर हे जेवायला बसले होते व त्यांची पत्नी देवयानी या त्यांना जेवण वाढत होत्या. याचवेळी नंदकुमार याने त्यांच्या घरात शिरून दिवाकर यांना लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळपास 12 ते 13 काठीचे फटके त्यांच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले व यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतरही नंदकुमार हा प्रूरपणे दिवाकर यांना मारहाण करत होता. यावेळी दिवाकर यांच्या पत्नी देवयानी या सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांच्याही डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यापकरणी नंदकुमार यांच्याविरोधात दिवाकर यांची पत्नी देवयानी यांनी गुहागर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा खटला सुरु असतानाच एकूण 16 साक्षीदार तपासले गेले. त्यामध्ये दिवाकर यांची पत्नी देवयानी तसेच अजित पिंपरकर, रोहिणी मोरे यांचीही साक्ष तपासली गेली. त्या तिघांची साक्ष न्यायालयाने गृहीत धरली. या पकरणाचा तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी केलेला सखोल दिवाकर हे जेवायला बसले होते व त्यांची पत्नी देवयानी या त्यांना जेवण वाढत होत्या. याचवेळी नंदकुमार याने त्यांच्या घरात शिरून दिवाकर यांना लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळपास 12 ते 13 काठीचे फटके त्यांच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले व यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतरही नंदकुमार हा प्रूरपणे दिवाकर यांना मारहाण करत होता. यावेळी दिवाकर यांच्या पत्नी देवयानी या सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांच्याही डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यापकरणी नंदकुमार यांच्याविरोधात दिवाकर यांची पत्नी देवयानी यांनी गुहागर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा खटला सुरु असतानाच एकूण 16 साक्षीदार तपासले गेले. त्यामध्ये दिवाकर यांची पत्नी देवयानी तसेच अजित पिंपरकर, रोहिणी मोरे यांचीही साक्ष तपासली गेली. त्या तिघांची साक्ष न्यायालयाने गृहीत धरली. या पकरणाचा तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी केलेला सखोल तपास तसेच सरकारी वकील पफुल्ल साळवी यांनी न्यायालयात दिलेली साक्ष, पुरावा तसेच केलेल्या युक्तीवादानंतर नंदकुमार याला दोषी ठरवत शनिवारी त्याला आजन्म कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास 6 महिने कारावासी शिक्षा ठोठावली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायालयो न्यायाधीश एन. एस मोमीन यांनी दिला. न्यायालयीन पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. टी. भंडारी, विनायक चव्हाण यांनी काम पाहिले.

दरम्यान, या वर्षामध्ये रत्नागिरी जिह्यामध्ये चिपळूण, खेड, रत्नागिरी या सत्र न्यायालयात एकूण 19 खटल्यांमध्ये सर्व सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादामुळे आरोपींना शिक्षा झाल्या आहेत. त्यामध्ये जन्मठेप, फाशी व अन्य शिक्षकाचा समावेश आहे. सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी चिपळूण सत्र न्यायालयात चालवलेल्या मागील दोन महिन्यांतील ही दुसरी जन्मठेप आहे.