चिपळूण:-चिपळूण तालुक्यातील वेहळेखान मोहल्ला येथे सुनेला मारहाण केल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद नफिसा साहिल नाईक (25, वेहळेखान मोहल्ला, चिपळूण) यांनी अलोरे- शिरगांव पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नफिसा नाईक व संशयित आरोपी जैनाब नाईक, रेश्मा नाईक, रुकय्या खान, दिलशाद खान, हनिफ पेचकर, साजिदा अनवारे, सोहेळ नाईक, दिलावर नाईक या नात्याने सख्खे चुलत आजी सासू आहेत. नफिसा नाईक या आपल्या सासरी राहण्यासाठी आल्या असता वरील संशयित 8 जणांनी हाताच्या थापटाने मारहाण करुन, हाताला चावा घेतला. तसेच नफिसा यांचा ड्रेस फाडून केस धरुन घराच्या बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्या तावडीतून सुटका करुन स्वतःच्या खोलीत जात असताना सोहेल नाईक याने घरात जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर हाताला पकडून गळयातील ओढणी पकडून घराच्या बाहेर काढले व परत घरात न येण्याची धमकी दिली.
नफिसा यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित जैनाब नाईक, रेश्मा नाईक, रुकय्या खान, दिलशाद खान, हनिफ पेचकर, साजिदा अनवारे, सोहेळ नाईक, दिलावर नाईक यांच्यावर भादविकलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.