घरगुती भांडणातून नातेवाईकांनी केली दोन लाखांची चोरी

रत्नागिरी:- घरगुती भांडणातून घरातील नातेवाईकांनी घर धुऊन नेल्याचा प्रकार शहरातील साळवी स्टॉप येथे उघड झाला आहे. लक्ष्मी अपार्टमेंट रहाणाऱ्या नातेवाईकांनी घरातील साहित्यासह २ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. या साहित्यामध्ये बंदुकीच्या लायसन्ससह जीवंत काडतुसे असलेली बंदुकची चोरी केली. शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुही केतन सनगर, राजेंद्र बसाळे (पूर्ण नाव माहिती नाही) आणि विक्री राजेंद बसाळे (रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) असे संशयितांची नावे आहेत. ही घटना २९ जुलै ते १७ डिसेंबर २०२३ या कालवधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमाकांत शंकर सनगर (वय ७२, लक्ष्मी अपार्टमेंट सी. वींग, साळवी स्टॉप, रत्नागिरी ) यांच्या घरातून २०० रुपयांची दरवाजाचा की बोर्ड, ५ हजाराचा सोफासेट, ५ हजाराचा एलईडी टिव्ही, १ हजाराचे एक भिंतीवरचे घड्याळ, ५०० रुपयांचे काळविट शोपीस, ६ हजाराचे फॅन, ९ हजार किमतीची एक बर्मिंग हॅम कंपनीची डबल बॅरल बंदुक, ६ हजाराचे एचपीचे सिंलेंडर, १५ हजार किमतीचा इन्व्हर्टर, १ हजार मिक्सर ज्युसर, ६ हजार ३०० वॉटर प्युरिफायर, २ हजार ७०० एकइंडक्शन शेगडी, २ हजाराचा लाकडी झोपाळा, ३ हजाराचे आयफेल टॉवर, दोन कार, सायकल, रिक्षा. १० हजाराचा वॉशिंग मशीन, २ हजार व्हॅक्युम क्लिनर, ५० हजाराची लगेज बॅग, बॅगमध्ये किमती साड्या, १ हजार २०० रुपयांची बंदुकीची १२ बोअरची २० नग जिवंत काडतुसे, एक बंदुकीचे लायसन्स असा सुमारे २ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी उमाकांत सनगर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.