रत्नागिरी:- घरकाम करणार्या नोकराने तसेच त्याच्या पत्नीने महिलेला मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.45 वा.स्टेट बँक कॉलनी येथे घडली.
मनोहर राहुल पवार आणि कल्पिता मनोहर पवार (दोन्ही रा.कुवारबाव,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात रीयाना युसूफ पागारकर (52,रा.स्टेट बँक कॉलनी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्यानूसार,मनोहर पवार हा त्यांच्याकडे कामाला होता.शुक्रवारी तो पत्नीसोबत पागारकर यांच्याकडे आपला पगार मागण्यासाठी गेला होता.तेव्हा रीयाना पागारकर यांनी माझे सोन्याचे दागिने घेतले ते पहिले दे असे मनोहरला सांगितले.या रागातनू मनोहर आणि त्याची पत्नी कल्पिता या दोघांनी रीयाना यांना शिवीगाळ करत फरशी पुसण्याच्या मॉपने तसेच हातांनी मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार विर करत आहेत.