ग्रामपंचायत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 10 सार्वत्रिक व 6 पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 6 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना विहित नमुन्यात निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.


10 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. सरपंचपदाच्या उमेदवारांना 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत तर सदस्यपदाच्या उमेदवारांना 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करण्यास मुभा दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसांपासून निवडणुक खर्च गृहीत धरला जातो. सरपंचपदाचे मंडणगड 2, दापोली 4, चिपळूण 3, संगमेश्वर 1 असे 10 तर सदस्यपदासाठी दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर,लांजा, राजापूर प्रत्येकी 1 अशा 6 जागा बिनविरोध झाल्या. त्यामळे 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सोमवारी (दि. 6) मतमोजणी झाली. त्यामुळे 6 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना विहीत नमुन्यात निवडणुकीचा एकूण खर्च सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे.
विजयी आणि पराभूत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.