गोळप-रनपार येथे घरात शिरुन नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-रनपार येथे घरामध्ये शिरुन नुकसान केल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात पूर्णगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संजय वामन सुर्वे यांनी या प्रकरणी पूर्णगड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विनायक वामन सुर्वे व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विनायक सुर्वे व त्यांची पत्नी यांना संजय सुर्वे  यांच्या घरामध्ये जाण्यास दिवाणी न्यायालयाने प्रतिबंधित केले होते. असे असतानाही ३१ जानेवारी २०२५ रोजी विनायक सुर्वे व त्यांची पत्नी यांनी संजय सुर्वे यांच्या घरामध्ये प्रवेश केला. तसेच घरातील सामानांचे नुकसान करत ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली होती.