रत्नागिरी:- गोळप येथे सख्ख्या भावाने बहिणीचे बंद घर फोडून घरात वास्तव्याला राहत असल्याचा जाब विचारल्याने बहिणीला दमदाटी केल्याची तक्रार पूर्णगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
फरिदमिर्झा अब्दुल कादीर पांढरे, सौ. आरजू फरिदमिर्झा पांढरे (दोन्ही रा. नालासोपारा मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याबाबची तक्रार श्रीमती रुहिजा अब्दुल कादीर पांढरे (43, एस. के. रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात दिली. ही घटना 10 जुलै रोजी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती रुहिजा पांढरे यांचे गोळप ग्रामपंचायत हद्दीत स्वतःच्या मालकीचे घर आहे. हे घर बंद स्थितीत असते. संशयित फरिदमिर्झा अब्दुल कादीर पांढरे याने व त्याची पत्नी आरजू पांढरे यांनी एकमेकांच्या संगनमताने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. व त्यामध्ये प्रवेश करुन रहायला लागले. याबाबत बहिण रुहिजा पांढरे यांनी मोबाईलवर फोन करुन याची विचारणा केली असता त्यांनी रुहिजा यांना दमदाटी केली, असे रुहिजा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार फरिदमिर्झा पांढरे, सौ. आरजू पांढरे यांच्यावर भादविकलम 451, 427, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.