गोळप येथे अवैध गावठी दारू बाळगणाऱ्या महिलेवर गुन्हा 

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे अवैध गावठी दारू बाळगणाऱ्या प्रौढावर पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. तेजश्री चंद्रकांत नार्वेकर (53, गोळपसडा शिरंबाडवाडी रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आह़े. ही कारवाई रविवार सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आल़ी.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळप येथे अवैध गावठी दारू विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी 15 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोळप येथे धाड टाकून संशयित तेजश्री नार्वेकर हिच्या ताब्यात अवैध 5 लिटर गावठी दारू आढळून आल़ी. तिच्यावर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.