गोळप-डोंगरेवाडी येथील विष प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- गोळप-डोंगरेवाडी येथील तरुणाने उंदिर मारण्याचे विष प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुदेश प्रकाश डोंगरे (३३, रा. गोळप-डोंगरेवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सुदेश डोंगरे याने रहात्या घरी कोणत्यातरी अज्ञात कारणातून उंदिर मारण्याचे विष प्राशन केले. त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.