रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील भागिर्थी पेट्रोल पंपासमोर गैरकायदा जमाव करुन बेकायदेशीर घोषणाबाजी, बॅनरबाजी केल्याप्रकरणी रत्नागिरीतील 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 जून रोजी सकाळी 11.35 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या जमाव बंदीच्या आदेशाचा भंग करुन मुंबई-गोवा महामार्गावर घोषणाबाजी, पोस्टरबाजी करणार्या डॉ. विद्या नागावकर (कारवांचीवाडी), बाळा उर्फ प्रदीप कचरे (सहयाद्रीनगर, टीआरपी, रत्नागिरी), अशोक गंगाराम पवार (पारसनगर, रत्नागिरी), भारती कांबळे (कापडगाव, रत्नागिरी), विनोद कांबळे (आदर्श वसाहत, कारवांचीवाडी रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबची फिर्याद पोलीस नाईक राहुल पावसकर यांनी दिली.