गुहागर पालपेणे येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण 

गुहागर:- तालुक्यातील पालपेणे, तेलेवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद मुलाच्या आई-वडिलांनी पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम सीताराम रहाटे (16, पालपेणे, गुहागर) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी आई-वडिलांसह देवदर्शनासाठी गेलेला असताना आपल्या मुलाला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. तो 30 जुलै पासून बेपत्ता आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 636 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास खालील मोबाईल क्रमांक 9359925982, 9130337296, 9420152900, 9960777698 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.