गुरांच्या गोठ्याला आग लागून 13 जनावरे दगावली

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून सुकलेल्या गवताने पेट घेऊन लागलेल्या आगीत १३ जनावरे जळून मृत्युमुखी पडली. ही दुदैवी घटना शुक्रवारी घडली तर मालकाचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.८)  रात्री संगमेश्वर तालुक्यातील मौजे – पाचांबे (नेदरवाडी) येथील  संजय महिपत जाधव यांच्या मालकीच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील वाळलेल्या चाऱ्याने पेट घेतला आणि आग लागली. यात गोठ्यातील १३ जनावरे मृत्युमुखी पडल्याचे पंचांनी सांगितले आहे.यामध्ये,६ मोठ्या आणि ३ लहान म्हैशिंसह २ रेडे,२ वासरे यांचा समावेश आहे.या दुर्घटनेत मालकाचे सुमारे  १०   लाख रुपयांचे नुकसान झाले आहे..