रत्नागिरी:- रिक्षा चालकांना भाडयासाठी घेउन जाऊन गुंगीचे औषध देत भर दिवसा लूटल्याची घटना शनिवारी रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर घडली. रत्नागिरी शहरात दोन ठिकाणी बेशुध्द अवस्थेत आढळलेल्या रिक्षा चालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र याप्रकारामुळे रिक्षा व्यायसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही हे रिक्षाचालक शनिवारी रात्री उशिरापर्यंत बेशुद्ध असल्यामुळे शहर पोलीस स्थानकात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शहर पोलिसांनी लुटारुचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे.
शहरातील रिक्षा व्यायसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याचा सुमारास बाजारपेठेतून दोन रिक्षा व्यायसायिकांना गणपतीपुळे येथे भाडे असल्याचे सांगून एक टोळके घेऊन गेले. त्यानंतर दोन्ही रिक्षा चालकांचा संपर्क होत नसतानाच एक रिक्षा चालक दुपारी व एक रिक्षा चालक सायंकाळी विविध ठिकाणी रिक्षातच बेशूध्द ठिकाणी आढळून आलले. यानंतर ही घटना उघड झाली. पंरतू दोन्ही रिक्षाचालक शनिवारी रात्री उशिरा पर्यंत बेशुध्द अवस्थेत असल्याने प्रत्यक्ष हकीकत समजलेली नाही. पंरतु गणपतीपुळे येथे भाडयाला जाण्याआधी नातेवाईक व मित्र परिवारांशी संपर्क करुन गणपतीपुळे येथे भाडयाला जात असल्याचे सांगितले.
आशिष संजय किडये ( रा. मांडवी) हे शनिवारी सकाळी ९ वाजण्याचा सुमारास नेहमीप्रमाणे रिक्षा व्यवसाय करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. बाजारपेठेत अज्ञात व्यक्तींनी त्यांना गणपतीपुळे येथे भाडे असल्याचे सांगून घेऊन गेले. यावेळी किडये यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करुन गणपतीपुळे येथे भाडयासाठी जात असल्याचे सांगितले होते. दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास आशिष किडये हे काही रिक्षा व्यावसायिकांना बेशुध्द अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार प्रसादाचा लाडूतून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झाल्यानंतर अंगावरील दागिने लंपास केले. दागिने लंपास केल्यानंतर बेशुध्द असलेल्या रिक्षा व्यावसायिकाला पुन्हा कोणी आणून सोडले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिक्षा चालकाला लुटल्याची एक घटना दुपारी उघड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी उद्यमनगर नजीकच्या चंपक मैदान येथे चौकात विनेश मधुकर चौगुले (रा. कसोप) हे रिक्षा चालक रिक्षेमध्ये बेशुध्द अवस्थेत आढळले. यामुळे रिक्षा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेही रिक्षाचालक शनिवारी सकाळी गणपतीपुळे येथे भाडयासाठी जात असल्याचे आपल्या सहकार्याला सांगून गेले होते. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास ते रिक्षेत बेशुध्द अवस्थेत आढळले. अंगावरील दागिने गायब होते, तर त्यांचा मोबाईल सीट मागे एक चादर सीटवर होती रिक्षा चालू स्थितीत ठेवून चावी घेऊन अज्ञात व्यक्ती फरार झाल्या.
दोन्ही रिक्षा चालकांवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वैद्यकीय अधिकार्यांनी दोन्ही रिक्षा चालकांबाबत शहर पोलिसांना माहिती दिली असून शहर पोलिसांनी लुटारुंचा शोध सुरु केला आहे. पंरतु या दोन्हीही रिक्षाचालकांना रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरती कोणत्या ठिकाणी लुटले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गणपतीपुळेला भाडे असल्याचे सांगुन दोन्ही रिक्षा चालकांना घेऊन गेलेल्या लुटारुंनी लूटल्यानंतर पुन्हा रत्नागिरीत आणून कसे सोडले याचा शोध पोलीस घेत आहेत.