गावठी हातभट्टी दारू विक्री प्रकरणी नाणीज येथील वृध्दाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे विना परवाना गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी वृध्दाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार ४ मार्च रोजी दुपारी १.२० वा.करण्यात आली.

प्रकाश शिवराम शिवगण (५६, रा. नाणीज शिवगणवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सहाय्यक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार,शनिवारी दुपारी शिवगण हा नाणीज येथील काजु बागेत विना परवाना गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्याजवळ बाळून असताना ही कारवाई करण्यात आली.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारु अधिनियम कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.