रत्नागिरी:- शनिवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथून जीवंत ९ गावठी हात बॉम्बची वाहतूक करणार्या दोन संशयितांना पोलिसांनी पकडले होते. आणखी दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या पथकाने काल वेंगुर्ल्यातून ताब्यात घेतले .आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , नारायण उर्फ दर्शन गणेश चव्हाण(२२ ), पांडूरंग यशवंत परब (३५ , दोन्ही रा.परबवाडी, वजराठ ता.वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) अशी काल सोमवारी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी रामा सुरेश पालयेकर (२२ , रा.वडखोल वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) आणि श्रीकृष्ण केशव हळदणकर (२४ , रा.गावडेश्वर मंदिराजवळ वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) या दोघांना हातखंबा येथून अटक करुन त्यांच्याकडून ९ गावठी हात बॉम्ब, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.