गाडीतळ येथे पतीकडून पत्नीच्या हातावर सुरीने वार

रत्नागिरी:- शहरातील गाडीतळ येथे अज्ञात कारणातून पतीने पत्नीला मारहाण करत तिच्या हातावर सुरीने वार केले. ही घटना बुधवार 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा.घडली.

शंकर दत्ताराम रसाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या गाडीतळ येथे देशपांडे यांच्या घरी केअरटेकर म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी त्या त्याच ठिकाणी कामावर असताना त्यांचा पती शंकर रसाळ तिथे आला. त्याने फिर्यादी पत्नीला हातांच्या थापटाने मारहाण केली. त्यानंतर आपल्याकडील धारदार सुरीने शंकरने पत्नीच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करुन दुखापत केली. त्यानंतर तिला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शंकर रसाळ विरोधात भादंवि कायदा कलम 452, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.