रत्नागिरी:-मी गांजा विकत असल्याची टीप पोलिसांना देतोस काय? तुला ठार मारतो असे म्हणत मारहाण केली. गाडीच्या चावीने गळ्याखाली, छातीवर जबरदस्त मारल्याने दुखापत झाली अशा आशयाची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास पूर्ण केला. न्यायालयात तरुणाविरुध्द आरोपपत्र दाखल केले. परंतु सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
सहल मुनीर कर्लेकर (हयातनगर, ९ रत्नागिरी) हा जयगड येथील तटरक्षक दलाचे देखभाल दुरुस्तीचे काम करतो. त्याला कंपनीने स्वीफ्ट डिझायर गाडी वापरण्यास दिली. जानेवारी 2020 रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास सहल हा उद्यमनगर येथे घरी येत असताना शफाकत हसन आदम राजपुरकर (39, साखरतर, रत्नागिरी) याने तेथे येऊन विचारले की, मी दोन दिवसांपूर्वी तुला फोन करत होतो. तू फोन का उपचलत नाहीस. राजपुरकर याने पैशाची मागणी केली. तसेच मी गांजा विकतो अशी टीप पोलिसांना देतोस काय, तुला ठार मारतो अशी धमकी सहल याला दिली. यावेळी बाचाबाची झाली. राजपूरकर याने गाडीच्या चावीने सहल याच्या गळ्याखाली जोरदार मारले. त्यात दुखापती झाल्या. हाताच्या ठोशाने मारहाण केली, अशी तक्रार सहल याने पोलिसांकडे नोंदवली.