गळफास घेत जयगडमधील युवकाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड चरेवाडी येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येच कारण स्पष्ट झाले नसले तरी प्रेम प्ररणातून युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. 

 राहुल एकनाथ जोबळे (२३) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. राहुल याने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या लोखंडी बारला नायलॉनच्या रस्सी ने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्याची आई आणि भाऊ नंदिवडे येथे डॉक्टरकडे गेले होते. दोघे परत आल्यावर राहुलने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. जयगड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास एएसआय गावित करत आहेत.