गयाळवाडी, चांदोर, पालीसह तालुक्यात नव्याने 27 बाधित

रत्नागिरी:- तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी रात्री नव्याने 27 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात गयाळवाडी आणि चांदोर परिसरात प्रत्येकी तीन रुग्ण सापडले आहेत. 
 

आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात चांदोर 3, गयाळवाडी 3, सिविल 1, साखरपा 1, मारुती आळी 1, खंडाळा 1, चिपळूण 2, शिपोशी लांजा 1, माळनाका 2, जोशी पाळंद 1, चाफेरी 1, पावस पानगलेवाडी 1, शांतीनगर 1, साळवी स्टॉप 1, पोलीस लाईन जेलरोड 1, देवरुख 1, खेडशी 1, गोळप 1, तांबट आळी 1, पाली 2 रुग्ण सापडले आहेत.