गद्दारांचे दिवस संपलेत, भाजपने त्यांना जागा दाखवली: विनायक राऊत

रत्नागिरी:- दावोसला महाराष्ट्राच्या, कोकणाच्या, रत्नागिराच्या हितासाठी उद्योग आणण्याच्या बहाण्याने उद्योगमंत्री उदय सामंत गेलेत. पण त्याठिकाणी गेलेले असतानासुध्दा उद्योगपतींशी चर्चा करायी सोडून त्यांना गद्दारी भाषा करावी लागतेय हे दुर्देव आहे. तेथे जाउन पक्ष फोडण्याची भाषा करताना काँग्रेस, ठाकरे सेनेतून किती फोडणार हि तुमची मर्दूमकी कसली? आता गद्दारांचे दिवस संपत आलेत, कारण भाजप नेत्यांनी त्यांना जागा दाखवायला सुरूवात केलेली असल्याची टिका ठाकरे शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राउत यांनी केली आहे.

रत्नागिरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात राउत यांनी बुधवारी दुपारी पत्रकारांशी सद्याच्या राजकीय घडामोडींवर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांया फोडाफोडीच्या राजकारणावर खरमरीत टिका केली. उद्योगमंत्री उदय सामंत हे राज्याला मिळालेत पण ते दुर्दैव आहे. ज्या विषयासाठी दावोसला गेलेत, त्या विषयावर बोलायचे सोडून ते गद्दारी किती होते, बेइमानीला आपण किती खतपाणी घालतोय अशी दुहेरी स्वप्न पाहताहेत. अशा उद्योगमंत्र्यांच्या बुध्दी किव करावीसी वाटत असल्याचे विनायक राउत म्हणाले.

रत्नागिरीत 17000 कोटींचे प्रकल्प येणार असे सामंत हे म्हणताहेत. पण तो प्रोजेक्ट येईल न येईल ते आता सोडून दय़ा. कारण रत्नागिरी विमानतळ करता करता ते थकून गेलेत असाही टोला राउत यांनी लगावला. केवळ आणि केवळ बतावण्या करायच्या, थापा मारायच्या यापलिकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केले हे दाखवून देण्याची आवश्यक असल्याचे राउत यांनी सांगितले आहे.
दावोसला राज्य सरकाराया खर्चाने दौरे करताय तर त्या पैशाचा विनियोग करायचा असेल तर राज्याच्या हिताच्यादृष्टीने तेथे कामे करावी. पण तेथे जाउन पक्ष फोडायची भाषा करू नये. कारण आता शिंदे गद्दारांचे दिवस संपत आलेत. भाजपाने त्यांची जागा दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आतासुध्दा दोन पालकमंत्री पदांना स्थगिती देवून भाजपाने जे हवे ते केलेले आहे. यांना आता काडीमात्र किंमत देत नसल्याची खिल्ली विनायक राउत यांनी उडवली आहे.

एकनाथ शिंदे गटाला भाजपा वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. नवा उदय वगैरे कोणी नाही. त्यामुळे त्यांना वास लागला होता, हे पद आता नाकारून चालणार नाही, म्हणून उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. शिंदीं जागा उदय सामंत घेताहेत असल्यी जोरदार चर्चा होत असल्याच्या विषयावर राउत यांनी गुगली टाकली आहे. उदय सामंत यांची त्यामध्ये मास्टरकी असल्याचे सांगितले. त्याबाबत ठाकरे सेनो नेते संजय राउत हे जे बोलले आहेत, त्यात तथ्य आहे. कारण काही दिवसांता 100 टक्के खरं आहे ते समोर येईल असेही विनायक राउत यांनी म्हटले आहे.