रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात सुरू केलेली दिवा ते सावंतवाडी, रत्नागिरी – मडगाव आणि सावंतवाडी ते मडगाव या रेल्वेगाड्या आता ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहेत. या मार्गावर नियमितपणे आरक्षित विशेष एक्स्प्रेस धावतील.
गाडी क्र. ०१५०६ सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शन ही गाडी ‘सावंतवाडी रोड’वरून रोज सकाळी ८:४५ वाजता सुटेल. दिवा जंक्शनला रात्री ८.१० वाजता पोहचेल. परतीसाठी गाडी क्र. ०१५०५ दिवा जंक्शन येथून रोज सकाळी ६.५५ वाजाता सुटून सावतवाडीला सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचेल. मडगाव जंक्शन – रत्नागिरी – मडगाव जंक्शन गाडी क्रमांक ०१५०२ मडगाव ते रत्नागिरी नियमितपणे मडगाव जक्शन येथून सायंकाळी ७.२५ वाजता सुटेल. ही गाडी ३० नोव्हेंबर पर्यंत रोज धावणार आहे. परतीसाठी गाडी क्रमांक ०१५०१ रत्नागिरी ते मडगाव ही गाडी रत्नागिरी येथून रात्री २.१२ वाजता सुटेल. मडगाव जंक्शनला सकाळी ७.४५ वाजाता पोहचेल. रत्नागिरी ते दिवा जंक्शन ही गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक ०१५०४ रत्नागिरी येथून रोज पहाटे ५:३० वाजता सुटेल. दिवा जंक्शनला दुपारी १.२५ वाजता पोहचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०१५०३ दिवा जंक्शन येथून दुपारी ३.३० वाजता सुटून रत्नागिरीला रात्री ११.२० वाजता पोहचेल. मडगाव ते सावंतवाडी रोड, अशी गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. गाडी क्र. ०१५०८ मडगाव जंक्शन येथून सकाळी ६.२० वाजता सुटून सावंतवाडीला सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१५०७ सावंतवाडी रोड येथून सायकांळी ५.४५ वाजता सुटेन मडगाव जंक्शनला रात्री ८.२५ वाजता पोहोचेल.