गणेशगुळे-गुरववाडी येथे प्रौढाची भावाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील गणेशगुळे-गुरववाडी येथे दारुच्या नशेत आई आणि भावाला शिवीगाळ करत भावाच्या डोक्यात कौल (नळा) मारुन दुखापत केली. ही घटना शनिवार 23 डिसेंबर रोजी दुपारी 1.15 वा.घडली.

याप्रकरणी मुकेश चंद्रकांत नागवेकर (रा.गणेशगुळे गुरववाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात राकेश चंद्रकांत नागवेकर (42, रा.गणेशगुळे गुरववाडी, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवारी दुपारी राकेश घरी जेवण बनवत होता. त्यावेळी दारुच्या नशेत घरी येउन मुकेश आपल्या आईला शिवीगाळ करु लागला. तेव्हा राकेशने मुकेशला तू आईला शिव्या का देतोस असे विचारले असता दोघांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. दरम्यान, मुकेशला राग आल्याने त्याने राकेशला घराच्या मागील बाजूस ओढत नेउन तेथील कौल (नळा) त्याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच तू जास्त बोललास तर तुला ठार मारीन अशी धमकीही दिली. याप्रकरणी मुकेश विरोधात भादंवि कायदा कलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.