रत्नागिरी :- कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत. रत्नागिरीतील जगप्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीनंतर आता पंतप्रधान सहाय्यता निधीसाठीही मदत दिली आहे. गणपतीपुळे देवस्थानने सुरुवातीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा लाखाची मदत दिली होती. त्यानंतर आता गणपतीपुळे मंदिर देवस्थानकडून पुन्हा एकदा कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी अकरा लाखांची मदत देण्यात आली आहे.
त्यामुळे गणपतीपुळे देवस्थानने एकूण 22 लाखांची मदत कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सरकारकडे जमा केली आहे. याशिवाय गणपतीपुळे मंदिर देवस्थानचे कर्मचारी आणि विश्वस्थांनी स्वतः एक लाखांची रक्कम गोळा केली गेली. हि रक्कम देखील पंतप्रधान सहाय्यता निधीत कोरोनाच्या लढाईसाठी जमा करण्यात आली आहे.