रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथील भगवतीनगर येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. रामरोड नजिक राहणाऱ्या बापट यांच्या मालकीच्या विहिरीत बिबटया पडला असून बिबट्याच्या बचावाचे प्रयत्न सुरू आहेत.
बिबट्या विहिरीत पडल्याचे बुधवारी सकाळी निदेर्शनाला आले. बापट यांनी याची माहिती पोलीस पाटील माईंगडे याना दिली. घटनास्थळी ग्रामपंचायत कर्मचारी, फॉरेस्ट खाते, पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले असून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत