रत्नागिरी:- कालपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने कोसळल्याने सात कुटुंबातील काही जण ढिगाऱ्याखालीअडकल्याचे मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या माहितीनुसार धामणंन बौद्धवाडी येथे मुसळधार कोसळणार्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे यामुळे सात कुटुंबातील सतरा जण ढिगाऱ्याखाली सापडल्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच चोवीस जनावरे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत या घटनेत दहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे