रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावरील खेडशी नाका येथे मातीच्या ढीगाऱ्यावरुन पडून 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. विद्या मिथुन चव्हाण (रा सोलापुर, सध्या खेडशी महालक्ष्मी मंदीर) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
मिऱ्या नागपुर महामार्गाचे काम सध्या सुरु असल्याने रस्त्याकडेला मातीचे ढिगारे करण्यात आले आहेत. खेडशी नाका येथे महामार्गाच्या कामावर मृत मुलीचे वडील काम करीत होते. बुधवारी दुपारी विद्या चव्हाण ही मुलगी मातीच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. यावेळी ती पाय घसरुन खाली कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी यावेळी तिला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यानी विद्या हिला तपासून मृत घोषीत केले.