खेडमध्ये दोन ठिकाणी जुगार अड्डयावर धाड, तिघांवर गुन्हा दाखल

खेड:- खेड एसटी स्टॅण्ड शेजारी चहाच्या टपरीजवळ पैसे लावून मटका जुगाराचा खेळ खेळणाऱया एकाला जुगाराच्या साहित्यासह ताब्यात घेतले आहे. रुपेश रवींद्र जाधव (24, संतसेनानगर, शिवतर रोड, खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दा खल करण्यात आला आहे.

दुसऱया घटनेत मौजे भरणेनाका येथे साळुंखे बिल्डींगच्याजवळ पेपरमधील शुभअंकावर पैसे लावून मटका खेळणाऱया दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पभाकर नागनाथ लोहार (38, भडगाव उसरेवाडी, खेड), सुरेश पकाश लोहार (38, भडगाव, उसरेवाडी, खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.