खेडमधील नारिंगी नदी किनारी माणसाचे अवयव सापडल्याने एकच खळबळ 

खेड:- तालुक्यातील सुसेरी गावातून वाहणाऱ्या नारंगी नदीच्या किनाऱ्यावर माणसाच्या हाताची बोटे, अवयव आणि मांसाचे तुकडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील सुसेरी नंबर २ या गावात ही घटना घडली. मुंबई येथून नातेवाईकाच्या कार्याला आलेल्या 65 वर्षीय बाळकृष्ण भागोजी करबटे हे रविवार दिनांक 24 रोजी रात्रीपासून अचानक बेपत्ता झाले होते. सकाळी गावकऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला असता नारंगी नदीच्या किनाऱ्यावर स्मशानभूमी नजीक हाताचे कट झालेले बोट आणि माणसाचे तुकडे मिळून आले.

त्यामुळे हा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.  त्यानुसार, खेड पोलिसांनी सकाळपासून नदीच्या डोहात मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. आता हे तुटलेले बोट आणि मासाचा तुकडा नेमका कोणाचा आहे? बाळकृष्ण करबटे रात्रीपासून बेपत्ता आहेत.त्यांचा आहे की अन्य कोणाचा? त्यांचा असेल तर त्यांचा घातपात कोणी आणि कशासाठी केला असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण भागोजी करबटे हे मुंबईत वास्तव्याला असतात नातेवाईकाच्या कार्यविधी साठी ते गावी आले होते. रविवार दिनांक २४ रोजी गावातील सर्व जण भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच बघत असताना ‘मी जाऊन येतो, असे सांगून ते घराच्या बाहेर पडले.

रात्री उशिरापर्यंत बाळकृष्ण करबटे न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांच्या सगळीकडे शोध सुरू केला. खाऊन खाऊन थकाल पण पदार्थ संपणार नाहीत; परवडणाऱ्या दरात या हॉटेलात अनलिमिटेड खा सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास नारंगी नदीच्या काठावर गावच्या स्मशानभूमी नजीक शोध सुरू असताना , हाताचे एक बोट तुटलेले सापडले. तसंच नदीच्या दिशेने फरफटत नेहल्याच्या खुणा देखील सापडल्या तिथेच पुढे काही अंतरावर मासाचे तुकडे देखील सापडले. गावकऱ्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात कळवले त्यानुसार खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीच्या डोहात एक बॅटरी देखील तरंगताना आढळली ती नेमकी कोणाची याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. सुसेरी नंबर दोन खालचिवाडी नजीक आढळून आलेल्या माणसाचे मांस व अवयव नक्की कोणाचे याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहे.