खेड:- दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे दि.25 जानेवारी 2017 रोजी आरोपी मंगेश मधुकर चौगुले (रा. टाळसुरे, जि. रत्नागिरी) याने खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत खेड येथील सत्र न्यायालय-1 चे न्यायाधीश डॉ सुधीर एम. देशपांडे, खेड यांनी 10 वर्ष सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये इतका दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास तसेच अन्य एका 2 वर्षे शिक्षा आणि 10 हजार रुपये इतका दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दापोली तालुक्यातील मौजे टाळसुरे येथील पिडीतेची आरोपी मंगेश मधुकर चोगुले हा त्रास देखुन तिचा मानसिक छळ करत होता. आरोपी पिडीतेस सतत फोन करुन मनस्ताप करत होता. पिडीता फोन उचलत नसलेल्या रागातुन आरोपी पिडीताला तिच्या घरी जावून चाकुने वार करुन तिला जखमी केले, आणि फरार झाला.
या घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी 7 महिन्यानंतर पकडले. त्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर प्रसंगाची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात सरकारी वकील ॲड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. पोलीस तपासिक अंमलदार पोलिस निरीक्षक अनिल लाड, सहायक पोलिस निरीक्षक सागर भगवान पवार, दापोली पोलीस ठाणेचे कोर्ट ऑर्डरली श्री. सुदर्शन गायकवाड यांचे सहकार्य लाभले.